#माझ्यातली मी
#लघुकथा टास्क
संगीता आणि सविता या दोघींनीही दहावीच्या बोर्डाची परीक्षा दिली … सुरुवातीला दोघीनाही वाटायचं की चांगले मार्क्स मिळाले नाही तरी चालेल , पण आपण या बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण तर झालंच पाहिजे … या एका उद्देशाने त्या दोघीही भरपूर अभ्यास करू लागल्या होत्या ..त्या दोघींमध्ये एक स्पर्धा निर्माण झाली होती , एक आत्मविश्वास निर्माण होऊ लागला होता . त्यामुळे त्यांच्या अभ्यासाला आणखीनच गती प्राप्त झाली होती … त्यामुळे दोघींचेही पेपर चांगले गेले होते … आता फक्त त्यांना निकालाची हुरहुर होती. कारण त्या एका गोष्टीने त्यांच आयुष्य बदलणार होतं , चांगले मार्क्स मिळाले तरीही आणि नाही मिळाले तरीही
शेवटी एकदाचा निकाल लागला …. अपेक्षाप्रमाणे सविताला चांगले मार्क्स मिळाले , त्यामुळे तिने सायन्स करायचं ठरवलं. आणि कमी मार्क्स मिळाल्याने संगीताने बी ए ला ऍडमिशन घेतलं .
……. आता सविता डॉक्टर बनली आहे …आणि संगीताने बीए करून त्यानंतर स्पर्धा परीक्षा देऊन ती आता एक आय ए एस ऑफिसर बनली आहे …
रूपाली मठपती….
शब्द संख्या १५०
