#माझ्यातलीमी
#अलकलेखन ( १७/९/२५)
#कर्तव्य
“मी तुझ्या बाजूने कधी विचार केलाच नाही”
तिने नवऱ्याच्या अनुपस्थितीत सासूबाईंना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. तात्काळ शस्त्रक्रिया करावी लागली. त्याने मला न विचारता शस्त्रक्रियेला होकार दिला म्हणून दूषणं दिली. डॉक्टरांनी त्याला सांगितलं की शस्त्रक्रिया केली नसती तर तुमची आई जिवंत दिसली नसती. त्यावेळी तो तिला म्हणाला, “माफ कर तू तुझे कर्तव्य केलंस. मी तुझ्या बाजूने कधी विचारच केला नाही.”
©️®️सीमा गंगाधरे

सुरेख अलक
मस्त अलक