काही नाती हि भाड्याच्या घरासारखी असतात,
कितीही जपली तरी आपली कधीच होत नाहीत….
वरील वाक्य वापरून कथा (१५/१२/२५)
करार लग्नाचा……
सतिश व मेधाचे लग्न होऊन बरीच वर्षे झाली होती. पण दोघेही कधी हसत खेळत गप्पा मारताना किंवा बाहेर बरोबर जाताना कोणीही बघीतले नव्हते. त्यांना कधी भांडणाताना किंवा वाद घालतानाही बघितले नव्हते. त्याला कारणही तसेच होते. त्यांचे लग्न म्हणजे नुसता कागदावरचा करार होता. त्यात प्रेम, आपलेपणा, ओढ … या कोणत्याच भावना नव्हत्या.
सतिशचे आई वडील तो लहान असतानाच अपघातात गेले. त्याला त्याच्या आजी आजोबांनी वाढवले. त्याला लहानपणापासून नको ती वाईट व्यसने लागली होती. त्याला लग्नच करायचे नव्हते. कोणतीही जबाबदारी नको होती. आजोबांची बरीच संपत्ती होती तो हा व्यसनात घालून टाकेल म्हणून आजोबांनी त्यांच्या नातातल्या मेधाशी लग्न केलेस तरच माझी सगळी संपत्ती तुमच्या दोघांच्या नावाने करीन व तू जर तिला नंतर घटस्फोट दिलास तर सगळी संपत्ती तिला मिळेल. अशी अट घातली होती. म्हणून नाईलाजाने तो तिच्या बरोबर रहात होता.
मेधाला नवरा म्हणून सतिश पसंत होता. आपण प्रेमाने व गोड बोलून त्याला सधारूया, अशी वेडी आशा तिला होती.ती तिच्या परीने त्याचे व्यसन सुटावे, तो सामान्य माणसा सारखा वागावा म्हणून खूप प्रयत्न केला. पण काही नाती हि भाड्याच्या घरासारखी असतात, कितीही जपली तरी आपली कधीच होत नाहीत. हे तिला कळून चुकले म्हणून तीही आता त्रयस्थपणे वागायला लागली होती.
शब्दसंख्या : २०८

Hey, heard about sv388ph. Is it any good for players in the Philippines? Anyone got the lowdown on this one? Give it a look: sv388ph