करायला गेला गणपती..झाला ???

Screenshot_2025-06-18-15-12-37-61_40deb401b9ffe8e1df2f1cc5ba480b12

तू#माझ्यातलीमी#लघुकथा#करायला गेलो एकझाले भलतेच@everyone
©®सीए संगीता मेहता पुणे

गणपती ऐवजी मारूती
—————————-

कुंभारवाड्यात सरिताभाभी आलेल्या.कडाका वैशाखाचा. हातानीच पाणी घेतलं माठातनं.
हात चालवता चालवता तो बोलत होता..करतो करतो नवरात्रीसाठी उंटावरती देवी तयार.
पोरगा सुटीमुळे मदत करत होता..हमालीच फक्त.

सरिताला शीतलबेन म्हणत होती..मुलगा अशी मदत
करतो तर छानच की.

तसा मुलगा लाजला.कुंभाराचा हातही थांबला न् तोंड चालू झालं.शिंचा काय कामाचा नाही.दह्यादुधातुपाची मडकी फस्त करतो.पैलवानकी गुडघ्यातल्या मेंदूची नुसती.
पाट्या टाकायच्या कामाचा फक्त.
लेक तणतणत बिन पायताणाचाच बाहेर पडला. पायताणांना कुरकुर ऐकत तिथंच थांबावं लागलं.

रक्तातला गुण लेकरात नाही उतरला तरी कैवार घेत कुंभार वहिनी पुढं सरसावल्या.

एवढी कला आहे हातात म्हणता.माड्या तर न्हाई बांधल्या.
काल ब्यांकंचा माणूस कागदं तोंडावरच फेकून गेला न्हवं.कुंभाराचा धंदा हंगामी.. बेभरवशी.कर्ज प्रकरण नामंजूरच.

त्या गोऱ्या कुंभाराला पायाखाली तुडवून टाकलेलं लेकरू परत मिळालं.पन तुम्ही खच्ची करताय त्याला.कोसळून पडला तर पुन्यांदा उभा राहील का तो??
सारखं सारखं टोचू नका त्याला.जाईल हातातनं.
सांगून ठेवते..त्यो गोरा कुंभार व्हता.तुम्ही काळू कुंभार हायती. विसरू नगा.

काळू कुंभार बाबा चडफडत राहिला.

आज लेकरानं निर्धार केला..गणपती घडवायचाच.
एकदा ‘ बा ‘ला करून दाखवायचंच..हम भी कुछ कम नहीं |
खूप प्रयत्न केला हो त्यानं पण काहीच जमेना.. तालमीतला मारूतीच आठवत होता..साधा सोपा.
शेवटी तो उठला..सुस्कारा टाकत.तसा कुंभार बाबा चवताळला.. त्यासाठी बुद्धी हवी ..गणपती मनात डोळ्यात भरून रहायला हवा.

मारूती पण मनोजवं..बुद्धिमत्ताम् वरिष्ठम् आहेच की. लेकाच्या मनात प्रश्न.प्रश्नांची विना उत्तर मातीच झाली.

त्यानं फसाफसा शेंदरी कलर फासला..नाही होत गणपती. गणपतीसाठी तयार कलर रूसल्यासारखे झाले.तसा कुंभार बाबा बोलला..शोभतो खरा जय हनुमान.पण शेपटी कुठंय माकडा?

लेकराला कळलं..टर उडवतोय बाप.मारूती पण नव्हताच जमला…गेला आत.
शेडसाठी नक्षीसाठी मिसळायला ठेवलेला रंग त्यानं सगळा संपवला..आणि आई धावली ..काळं का फासतोयस राजा मूर्तीला?? तसा बाप बोंबलत राहिला..तूच काळं कर ना तोंड इथनं कायमचं.

उचलली मूर्ती..बामनाचा बाळ्या आला..अरे हा तर शनी तयार झाला.यालाही चेव चढला.सांगतोस का बाळ्या..तुझ्या बाबांना प्राणप्रतिष्ठा करायला??
तालमी समोरच्या शेडखाली?

तो आता दर शनिवारी बसतो तेलात काळे उडीद खडे मीठ टाकून बाटल्या आणि रुईच्या माळा विकत.
नारळ लिलावात घेतो.पुन्हापुन्हा विकतो.आईपण मिरच्या ओवून देते.काळ्या बाहुल्या लिंबं.बारा महिने चलती.
घर संसार आरामशीर भागतंय.
शनीला सगळेच घाबरून राहतात ना.

बा देव घडवतो..लेक बिघडलेल्या नशीबांना तोटके पुरवतोय..उतारे विकतोय.
आताशा बापही टरकून आहे लेकाला..उगाच रागाच्या भरात तोंड कुठं काळं नको करायला.

आता नातवाला शाळेत प्रोजेक्टसाठी करायची होती इकोफ्रेंडली बाप्पाची मूर्ती.

तसं आज्यानं सांगितलं.. बाळा.. हात माखवायचे मातीत..असे थापताना.
कपड्यावर डाग पडतील म्हणून आखडते नाही घ्यायचे.

पहिलं बक्षीस मिळालं..
तसं बाप ओरडला.. शेवटी माझा मुलगा आहे तो.

त्याच वेळी आज्या पण एकाच सुरात लेकासंगत
बोलत होता..शेवटी नातू कुणाचा? या काळू कुंभाराचा.

संत गोरा कुंभार बाबा की जय 🙏🏾🙏🏾🙏🏾
सध्या तर
गणपती
शनी मारूती
सगळेच
प्रसन्न
इति कुंभारवैनी.

©®सीए संगीता मेहता पुणे

5 Comments

  1. मंजुरी करिता धन्यवाद संगिता देवकर मॅम..!!
    श्रीगणेशा तर झाला .
    आपणास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ..!!

  2. Wrong typing दिसत आहे
    एडिट कसे करायचे

  3. अवश्य वाचा अभिप्राय वाचायला उत्सुक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!