कथा लेखन

” आवडती व्यक्ती कितीही चुकली तरीही सांभाळून घ्यावंच
लाकतं कारण चुकांपेक्षा व्यक्ती जास्त महत्वाची असते. ”
वरील वाक्या वरून कथा.. (३०/१२/२०२५)

इन्स्पेक्टर विजयला खबर मिळाली की, आज रात्री दोन वाजता बंदरावर एका बोटीतून स्मगलिंगचा माल येणार आहे. त्यांनी सापळा रचून गुन्हेगारांना माला सकट पकडले. त्यात त्यांचा सख्खा भाऊ अजय पण होता. कायद्या पुढे कोणी आपले परके नसते. त्यांनी अजयला पण ताब्यात घेतले.

अजय वाईट संगतीमुळे वाया गेला होता, चोरी, मारामाऱ्या, गुंडगिरी मुळे एक दोनदा जेलची हवा पण खाऊन आला होता. पण हे विजयला माहिती नव्हते. लहानपणीच आईबाबा अपघातात गेले. दोघेही मामाकडे मोठे झाले. दोघेही मामाला दुकानात व मामीला घरात मदत करायचे. विजय समजूतदार व हुशार होता. दहावी नंतर विजयला शिक्षणा साठी मामाने बाहेर ठेवले. अजयला शिक्षणाची आवड नव्हती म्हणून तो मामा बरोबर दुकानात काम करायला लागला. त्याबद्दल मामा त्याला पैसे देत होते. लहान वयात पैसे हातात यायला लागल्यावर नको त्या सवयी त्याला लागल्या. पण विजयचे अजयवर खूप प्रेम होते. तो त्याचा लाडका होता.

या दुष्ट चक्रातून त्याला बाहेर काढायलाच हवे. म्हणून विजयने अजयला माफीचा साक्षीदार केले व यातून त्याची सुटका केली. आवडती व्यक्ती कितीही चुकली तरीही सांभाळून घ्यावंच लाकतं कारण चुकांपेक्षा व्यक्ती महत्त्वाची असते.

शब्द संख्या : १८८

error: Content is protected !!