कंट्रोल अल्ट डिलिट _रिस्टार्ट

inbound9199099350191360247.jpg

#माझ्यातलीमी
#सुप्रभात
#ब्लॉगलेखनटास्क (२४/११/२५)
@everyone

खाली दिलेल्या वाक्या वरून #कथा/ #ब्लॉग लिहा

*आयुष्यामध्ये डिलीट बटण नक्की ठेवा,*
*कारण काही खोटी नाती, काही खोटी माणसं आणि काही चुकीच्या आठवणी हे सर्व डिलीट झालंच पाहिजे.*

**कंट्रोल अल्ट डिलिट — रिस्टार्ट*

सीमा, प्रतिभा आणि लीना या तिघीही खूप चांगल्या मैत्रिणी असतात.. त्या तिघीही आयटी च्या शेवटच्या वर्षाला असतात. होतं असं की कॅम्पसमध्ये प्रतिभाला आणि लीनाला या दोघींनाही एकदम हाय पॅकेजचा जॉब मिळतो .. पण सीमाला तिच्या मनासारखा जॉब मिळतच नसतो..

प्रतिभाला जॉब मिळतो तो बेंगलोरला त्याच्यामुळे प्रतिभा बेंगलोरला निघून जाते आणि लीनाला मुंबईतच जॉब मिळतो.. सीमा मात्र जॉब च्या शोधात बेचैन झालेली असते.. हळूहळू होतं असं की सीमाच्या मनामध्ये प्रतिभा आणि लीना बद्दल हेवा निर्माण होतो. कुठेतरी एक ईर्षा निर्माण होते की आपल्याला या दोघींसारखा हाय पॅकेजचा जॉब नाही मिळाला ..त्यामुळे सहा ते आठ महिन्यातच त्यांच्यामध्ये थोडेसे खटके उडतात आणि हळूहळू एकमेकांशी त्यांचा संबंध कमी होत जातो आणि नंतर नंतर त्यांच्या मधला संपर्क अगदी तुटूनच जातो..

नंतर होतं असं की पाच वर्षानंतर प्रतिभा सीमा आणि लीना या दोघींनाही फेसबुक वरून मेसेज पाठवते की मी मुंबईला आलेली आहे आणि मला तुम्हाला दोघींना भेटायचं आहे आपण भेटूया ना किती वर्ष आपण भेटलो नाही कॉलेजच्या त्या जुन्या आठवणी आपल्या त्या जुन्या मौज मस्ती ,गमती जमती ,जुने मैत्रीचे क्षण सगळ सगळ आठवायला कॉलेज जवळच्या आपल्या तिघींच्या आवडत्या रेस्टॉरंट मधे भेटूया ना ..लीना , सीमा ही तयार होतात. . भेटण्यापूर्वी प्रतिभा दोघींना कॉन्फरन्स कॉल वर सांगते आपण जशा चांगल्या आठवणी काढायला भेटणार आहोत ना तसच जुन्या कटू आठवणींना आपण भेटल्यावर कायमच डिलिट मारायचं आहे …सीमा ला ही कळत की हे मुख्य म्हणजे तिला उद्देशून आहे पण ती ही हसून म्हणते ,” हो हो डिलिट मारून झाल्यावर , एकाच वेळी कंट्रोल अल्ट डिलिट दाबून आपल्या मैत्रीला रीस्टार्ट करूया..लीना ही म्हणते तुमच्या दोघींचं बोलणं माझ्याकडून कॉपी पेस्ट ..

मग त्या तिघीजणी त्यांच्या नेहमीच्या त्या आवडत्या रेस्टॉरंट मध्ये भेटतात ..भेटल्यावर तिघींनाही खूप आनंद होतो कारण पाच वर्षानंतर भेटलेल्या असतात ..आधी तर त्या तिघी एकमेकांना कडकडून मिठी मारतात .. आणि मग त्यांच्यात संवादाला सुरवात होते … तुझ्या आयुष्यात काय चालू आहे ,काही नवीन , कोणी भेटला का ? असा एकमेकींचा त्यांचा संवाद सुरू होतो ..

लीना :…. माझ्या आयुष्यात असं म्हणण्यासारखं काहीच घडलेलं नाही या पाच वर्षांमध्ये झालं असं की मला कॅम्पसमध्येच हाय पॅकेजचा पहिला जॉब मिळाला त्या जॉब मध्ये मी दोन वर्ष काम केलं, त्याच्यानंतर मला अजून चांगल्या पॅकेजचे ऑफर आली मला फॉरेनला जायची संधी मिळाली. त्याच्यामुळे मग मी एक वर्ष तिकडे निघून गेले आणि या कालावधी मध्ये , माझ्या लग्नासाठी स्थळ पण आई बाबा बघायला लागले. आता तुम्हीच सांगा माझ्या पॅकेज पेक्षा जास्त पॅकेज मुलगा मला मिळावा अशी जर मी अपेक्षा केली तर ती माझी अपेक्षा चुकीची आहे का? पण मला तसा मुलगाच मिळत नव्हता की ज्याचं पॅकेज माझ्यापेक्षा चांगल आहे .. त्यामुळे मी त्यांना नकार दिला …आणि दोन तीन होते असे की त्याचं पॅकेज माझ्या पेक्षा चांगलं होत पण काय माहित का पण त्यांनी मला नकार दिला .. मग विचार केला अरेंज मॅरेज पेक्षा लव मॅरेज करता येत का बघू , एक मुलगा ही मिळाला पण बरं मला वेळीच
लक्षात आलं की तो चीटर आणि लफडेबाज आहे त्याच्यामुळे मी ते खोटं नातं आणि ती खोटी व्यक्ती हे दोन्ही माझ्या आयुष्यातून डिलीट करून टाकले ..त्याच्यामुळे सध्या तरी मी सिंगलच आहे पण जाऊ दे ना, मी माझ्या करिअरमध्ये खुश आहे .झालं लग्न तर ठीक नाही झालं तरी ठीक. . कारण मी ठरवलं की मी लग्न करेल तर अशाच मुलाचे की जो माझ्या स्टेटसला माझ्या प्रोफाईल ला मॅच असेल आणि त्याचं पॅकेज माझ्यापेक्षा हाय असेल ..

सीमा:…. तुम्ही दोघी गेल्यानंतर मला नोकरी मिळाली पण तेही एकदम कमी पॅकेजचे पण मग मी ती स्वीकारली ..कारण माझ्यापुढे दुसरा पर्याय नव्हता .. पण माझी ही अपेक्षा होती की माझ्या मैत्रिणींना माझ्यापेक्षा हाय पॅकेज आहे तर निदान माझं लग्न तरी अशा मुलाशी व्हावं ज्याचं हाय पॅकेज असेल …पण तिथेही मी माती खाल्ली ..मला हवा तसा मिळाला नाही …माझ्या नवऱ्याला माझ्यापेक्षा जास्त पॅकेज होत पण तुमच्याएवढ नव्हतं .. पण लग्नानंतर मात्र काही दिवसातच मला हाय पॅकेज चा जॉब मिळाला.. मग माझ पॅकेज त्याच्यापेक्षा जास्त झाल ..पण लग्न तर ऑलरेडी झालेलं होतं पण कालांतराने हळूहळू आमच्यात खटके व्हायला लागले, त्याला असं वाटायचं की माझं पॅकेज जास्त म्हणून मी त्याच्याशी चिडून वागते त्याला न्यूनगंड व्हायला लागला .. शेवटी काही दिवसांनी आम्हाला असं वाटलं की आम्ही एकमेकांसाठी नाही बनलेलो. आमचं नातच खोटं आहे असं मला वाटलं आणि मी सरळ घटस्फोट घेतला आणि त्याला, आमच्या त्या नात्याला माझ्या आयुष्यातून डिलीट करून टाकल. त्याच्यामुळे आता मी पुन्हा माझ्यासाठी मुलगा शोधत आहे , हाय पॅकेजवाला .

प्रतिभा :…. माझ्याबद्दल सांगायचं तर मी इथून नोकरीसाठी बेंगलोरला गेले .तिथे मला अमित भेटला . अमितला माझ्या एवढ पॅकेज नव्हतच. मुळात अमितचा सगळं अन्सरटनच होत कारण अमितला शेअर मार्केटची आवड होती आणि शेअर मार्केटमध्ये कधी चाललं तर भरपूर पैसे नाही तर नाही.. पण तरीसुद्धा मी अमित शी लग्न करायचा ठरवलं कारण माहित आहे का ? कारण मला अमितचे विचार आवडले ,स्वभाव आवडला .. अमित खूप सपोर्टिव्ह आहे.. मी हे ठरवलेलं की लग्न झाल्यानंतर मी तर माझ्या नोकरीमध्ये खूप व्यस्त राहणार मग संसार ,नंतर मुलं होणार मग त्यासाठी मला माझ्या आयुष्यात जोडीदार पाहिजे होता ,त्याच पॅकेज नाही.. त्याच्यामुळे मी अमित बरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला ..
मला अमित ही म्हणाला की मी तुझ्या एवढा कमवत नाही पण मी त्याला सांगितलं की “पॅकेज की ऐशी की तैशी ” मला पैशाची नाही तर मुलाशी लग्न करायचं आहे .. मला कधी कधी खूप रात्री यायला उशीर व्हायचा .पण त्याने कधीच तक्रार केली नाही कित्येक वेळेला मी घरी येईपर्यंत त्याचा सगळा स्वयंपाक ही तयार असायचा . आम्हाला दोन वर्षातच जुळी मुलं झाली ..आम्ही दोघे मिळून घर ,संसार ,मूल सांभाळतो ,एकमेकांवर भरपूर प्रेम करतो ,एकमेकांचा आदर करतो .. सीमा ,लीना फक्त तुम्ही दोघी नाही तर अनेक तरुण मुली पॅकेजच्या नावाखाली चांगली मुलं नाकारतात.. घटस्फोट प्रमाण ही आपल्या देशात किती वाढत चाललं आहे.. मला हीच भीती वाटते की तडजोड,सामंजस्य जर तरुण मुलमुलींमध्ये नसेल तर काही दिवसांनी लग्नसंस्थाच डिलिट होऊन जाईल ..

लीना,सीमा दोघीही प्रतिभाचे त्यांचे डोळे उघडले म्हणून आभार मानतात ..

तेव्हा प्रतिभा म्हणते , ” आयुष्यामध्ये डिलीट बटन नक्की ठेवा कारण काही खोटी नाती, काही खोटी माणसं आणि काही चुकीच्या आठवणी हे सर्व डिलीट झालेच पाहिजे पण आपल आयुष्य म्हणजे कम्प्युटर नाही की तुम्ही काहीही डिलीट करत जाल ज्यामुळे नातीगोती टिकणार नाहीत किंवा नवीन नाती निर्माणच होणार नाहीत ..आणि त्यामुळे आपल्याला आयुष्य जगणंच कठीण होईल ..

सीमा ,लीना : …( अगदी हात जोडून ) प्रतिभा देवी ,मान्य ,तुमच्यामुळे आज आयुष्य नव्याने रिस्टार्ट केलं ,एकाचवेळी कंट्रोल अल्ट डिलिट बटन दाबून ..

तिघीही हसून पुन्हा एकमेकींना मिठी मारतात..

सौ स्वाती येवले

30 Comments

  1. Наткнулся на отличный обзор инновационной кухонной техники. Речь о варочных панелях Elica NikolaTesla со встроенной вытяжкой. Очень подробный разбор характеристик и преимуществ для современной кухни. Рекомендую почитать всем, кто планирует ремонт или обновление техники. Подробности по ссылке в источнике.
    business-gazeta.ru/article/618350

  2. Новости России Россия активно развивает туристический сектор, представляя новые маршруты и инфраструктурные проекты. Одной из ключевых инициатив является поддержка внутреннего туризма и привлечение иностранных гостей, заинтересованных в уникальных культурных и природных достопримечательностях страны. Власти разрабатывают программы развития туристической инфраструктуры в регионах, предлагая льготы и инвестиционные стимулы для предпринимателей.

  3. Avia Masters de BGaming es un juego crash con RTP del 97% donde apuestas desde 0,10€ hasta 1.000€, controlas la velocidad de vuelo de un avion que recoge multiplicadores (hasta x250) mientras evita cohetes que reducen ganancias a la mitad, con el objetivo de aterrizar exitosamente en un portaaviones para cobrar el premio acumulado
    avia masters descargar

  4. Avia Masters de BGaming es un juego crash con RTP del 97% donde apuestas desde 0,10€ hasta 1.000€, controlas la velocidad de vuelo de un avion que recoge multiplicadores (hasta x250) mientras evita cohetes que reducen ganancias a la mitad, con el objetivo de aterrizar exitosamente en un portaaviones para cobrar el premio acumulado
    https://share.google/KxlJOiP0KBHkw0OxU

  5. Aesthetic Files Мир кино и литературы – это мои проводники в другие реальности. Я погружаюсь в сложные сюжеты, сопереживаю героям и нахожу ответы на вопросы, которые задает мне жизнь. Делаю обзоры на сериалы и фильмы – это мой способ поделиться своими эмоциями, разложить увиденное на составляющие и пригласить вас к дискуссии. Мое мнение – это не истина в последней инстанции, это лишь отправная точка для новых открытий.

  6. эвакуатор Володарск Эвакуатор Мариуполь круглосуточно – это значит, что независимо от времени суток и дня недели, вы можете рассчитывать на профессиональную помощь. Служба эвакуации работает 24/7, готовая прийти на помощь в любой сложной ситуации.

  7. https://sites.google.com/view/gas-fireplace-hub-website/home Gas fireplaces have come a long way in terms of efficiency and safety compared to earlier generations. During my research into different brands is that even within the same fuel type, heat distribution and control precision can vary a lot. Certain manufacturers focus on smart controls and flame customization, while others are built around long-term reliability and simpler engineering. Understanding these differences really helps when selecting a fireplace that fits both the house layout and how often it will be used during the heating season.

  8. купить Zip пакеты с логотипом Zip пакеты – это универсальное решение для хранения и упаковки, доступное каждому. Простота использования, надежность и многофункциональность делают их незаменимым помощником в быту и бизнесе.

  9. изготовление картонной упаковки Разработка конструкции гофроупаковки – это процесс создания оптимальной упаковки с учетом особенностей товара, условий транспортировки и требований к дизайну. Грамотно разработанная конструкция позволяет защитить товар от повреждений, оптимизировать использование материала и снизить транспортные расходы.

  10. фриспины без депозита Бонусы за регистрацию – это стандартная практика в индустрии онлайн-гемблинга. Они служат стимулом для игроков выбрать именно это казино среди множества других. Бонусы могут быть разными: от бесплатных вращений до бонусных денег на счет.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!