एक भारदस्त भेट

# माझ्यातली मी
# विकेंड टास्क दि-17/1/26
#वाक्यावरून कथा

विषय—पाहिले न मी तुला तू मला न पाहिले

*एक भारदस्त भेट*

मॅडम, नमस्कार,साहित्य शारदा मंदिर पुणे येथून,मी व्ही एन पॉल बोलतोय
आपला कथासंग्रह पुरस्कारासाठी निवडला गेलाय, पुरस्कारासाठी आपणास येथे 17 तारखेला पुरस्कार घ्यायला पुण्याला यायचंय बरं का!वेळ कमी असल्याने बाकी डिटेल्स मी मेल पाठवतोय.

काय भारदस्त आवाज ह्या माणसाचा ना! मी तर आवाजाच्या प्रेमातच पडले.कधी ह्या माणसाला बघेन असेही वाटले.

जेमतेम सात दिवस होते. तात्काळ तिकीट मिळतंय का ते बघायला काही मित्र मैत्रिणींना सांगितले. आनंदाची बातमी सगळ्या मित्र मैत्रिणींना सांगितली.

तिकीट मिळाले नि ह्यांना सोबत घेऊन मी निघाले.आधल्या दिवशी पोहोचले लॉजवर राहून सकाळी दहाला कार्यक्रम स्थळी पोहोचले. अगदी वेळेवर कार्यक्रम सुरू झाला. माझ्या नावाचा पुकारा झाल्यावर स्टेजवर गेले पुरस्कार घेऊन झाला. कार्यक्रम संपल्यावर सभोवती विचारले की हे व्ही एन पॉल कुठे भेटतील का.
ते कार्यालयाचं काम बघतात असे कुणीतरी सांगितले. कार्यालयाकडे गेले तर कळलं की आताच बाहेर गेलेत. आम्ही दोघेही जरा वेळ वाट बघत बसलो. थोड्याच वेळाने एक गृहस्थ वॉकर घेऊन चालत आले नि खुर्चित बसले. ज्या चपराशाला पॉल सराबद्दल विचारले होते तो सांगत आला, मॅडम हे पॉल सर आले आहेत.
मला थोडं शॉकिंग झालं, पण तरीही स्वतःला सावरत पुढे जाऊन बोलले, आपणच पॉल सर का?
होय.
आपला आवाज कानाला खूप सुखावह वाटतो.
हो का? असं बरेच जण म्हणतात.
आपले पाय,–माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून ते म्हणाले,

देशसेवेत होतो अपघातात दोन्ही पाय गेले. पे़न्शन भरपूर आहे. शारदे कडे बोट दाखवून म्हणाले, साहित्य शारदेची सेवा सहज आवड म्हणून करतो. तिच्या सहवासात काही थोडं फार लिहीतो. आपण स्वतः हून इथपर्यत आलात छान वाटलं,एक छोटीशी भेट देतो, म्हणून एका पुस्तकावर स्वाक्षरी करून हातात देत म्हणाले हे माझे लेखन.

धन्यवाद म्हणत आम्ही परतीच्या वाटेवर निघालो.
फार जास्त वेळ न बघितलेल्या माणसाचाच विचार मनात सतत घोळत होता. एखादं व्यक्तिमत्व असं हृदयास भिडून जातंय.

नकळत ओठावर येतं पाहिले न मी तुला तू मला न पाहिले….

©®स्वाती देशपांडे (सुमन)
19/1/26

error: Content is protected !!