ii एक पोर ii
रस्त्यावरती चालतांना भेटलं एक निरागस रूप, फाटके होते कपडे त्याचे अन् विलक्षण होतं त्याचं स्वरूप…..
केस होते विस्कटलेले अण् डोळ्यात होतं पाणी, हात वर करून करून गात होतं गाणी…..
हळूच आल माझ्या जवळ अन् म्हणालं, “दे ग ताई, एक रूपा” भूक खूप लागली आहे कर थोडी कृपा……
शब्द त्याचे ऐकून मन झालं उदास, इवल्याशा त्या जीवाला सोसावा लागतोय उपवास…..
केविलवाणी त्याची स्थिती पाहून वाटत होतं वाईट, आई-वडिलांबद्दल विचारल्यावर म्हणत होतं मला नाही माहीत…….
काय गुन्हा असेल त्याचा जो भोगतोय तो शिक्षा, पोटाची भूक भागवण्यासाठी पोर मागतय भिक्षा……..
हातात त्याच्या देता पैसे आलं त्याला हसू, थोड्या क्षणासाठी मीही सुखावले पण डोळ्यात होते मात्र फक्त आसू..
✍️कविता सचिन रोहने, सातारा, महाराष्ट
