…… उद्योग हस्तकलेचा…….

# माझ्यातली मी #
*** वीक एंड टास्क ***(२३/०१/२६)
…… जाहिरात लेखन…….
•••••••••• उद्योग हस्तकलेचा ••••••••••••
सकाळच्या कोवळ्या उन्हात रविवारची सुट्टी असल्यामुळे आई-बाबा बागेत खुर्चीवर बसले होते. त्यावेळेस मी बारा तेरा वर्षाची होते. लहानपणापासून आईला मी नोकरी करून फुलांचे व हलव्यांचे दागिने करताना पाहिले. ती ते करत असताना मी त्याचे बारकाईने निरीक्षण केले. आपसूकच ती कला मला अवगत झाली.

माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी लागेपर्यंत मी आईला तिच्या कलेत मदत करायचे. तिला पण माझे खूप कौतुक वाटायचे.
ती म्हणायची,
बाळा अंजू, तू माझं कौतुकाचं बाळ आहेस. नाहीतर आजकालच्या मुली कुठे एवढे घर कामात लक्ष देतात.
मी म्हणाले,
आई, मला नोकरीबरोबर ही कला पण जपायची आहे.
जमेल ना ग मला.
आई म्हणाली,
का नाही जमणार! तू जर या कलेचा विडा उचलला तर ते स्वप्न तुझं पूर्णच होणार.

एक-दोन वर्षात मला नोकरी लागली. मी कामावर पण रुजू झाले. संक्रांत आली की माझी आई घरी हलवा करून हलव्याचे दागिने व नववधूच्या डोहाळ जेवणाचे फुलांचे दागिने ऑर्डर घेऊन करीत असे. तिने स्वतःला या कलेत झोकून दिले. निवृत्तीनंतर तिच्या कलेला अधिकच उधाण आले.

माझेही एक वर्षातच लग्न झाले. माझे मिस्टरही चांगल्या हुद्द्यावर नोकरीला होते. आम्ही दोघेही कामात व्यस्त होतो. मला ही हस्तकला नोकरी सांभाळून पुढे न्यायची होती व त्याला माझ्या नवऱ्याची व सासूबाईंची मुळीच आडकाठी नव्हती. सासुबाई तर खूपच हौशी. त्यांना माझे फार कौतुक वाटले.
त्या म्हणाल्या,
अंजू, नक्की तू या कलेत शिर. घर कामाची मुळीच काळजी करू नकोस. मी खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभे राहीन.
मग काय विचारता माझ्या आनंदाला उधाण आले.

जानेवारीत येणाऱ्या पौष महिन्याकडे माझे डोळे लागले. केव्हा एकदा गोड संक्रांतीचा सण येतो ते. आई जशी घरी हलवा करायची तसाच हलवा सासूबाईंनी मला करायला शिकवला. तिळाचा,खसखशीचा,मुरमुर्याचा या आणि अशा अनेक प्रकारचा हलवा, पांढराशुभ्र काटेरी व रंगीत हलवा माझ्याकडून त्यांनी करवून घेतला.
मी म्हणाले,
आई, तुम्ही माझ्या पाठीशी उभ्या आहात म्हणून मी हे सगळं काही करू शकते. मग काय मला ऑर्डर वर ऑर्डर मिळायला लागल्या. हलव्यांच्या दागिन्यासोबत मला फुलांच्या दागिन्यांची कला सुद्धा अवगत झाली. वेगवेगळ्या प्रकारची फुले वापरून फुलांचे सुंदर दागिने व हलव्याचे दागिने करून ऑर्डर पूर्ण करायची. मला स्वतःला पैशाची कमी नसल्यामुळे मी दोन्ही प्रकारचे दागिने गरजूंना तशीच द्यायची.

दिवसागणिक माझ्या कलेची जाहिरात होत गेली. मग ऑर्डरही वाढत गेल्या. पण त्यानंतर काम पूर्ण करणे अशक्य होत गेले. तेव्हा माझ्या सासूबाईंनी सल्ला दिला की तू आता फुकट करत जाऊ नकोस. नावाला तरी पैसा घेत जा. कारण फुकटाला काहीच किंमत राहत नाही. नंतर मी नाममात्र पैसा घ्यायला सुरुवात केली. तोच मी व्यवसाय व्यवसायिक दृष्ट्या उभा केला व तो भरभराटीसही आला.

माझ्या उद्योगाची जाहिरातही झाली व तो A. A. क्रिएशन म्हणून प्रसिद्धीसही आला.
तात्पर्य •••••
मशीनने बनविलेल्या निर्जीव वस्तूंपेक्षा जीव ओतून केलेली हस्तकला केव्हाही चांगली.
स्वतः बनविलेले दागिने हे केवळ सौंदर्य म्हणून नाही तर नात्यातील गोडवा ही वाढवतात.
….. ही कथा हेच दर्शविते की परंपरेचा गोडवा नवीन विचारांना जोडून ठेवतो.
………… अंजली आमलेकर………….

error: Content is protected !!