#ईश्वरी
महेश व ईश्वरी हे अतिशय गोड जोडपे. नावाप्रमाणेच शिव व पार्वती सारखेच. दोघेही उत्तम जलतरणपटू. एका जलतरण स्पर्धेतच त्यांची ओळख होते. काही वर्षात ते लग्न करतात. हनिमून वरून कार ने परत येत असताना त्यांचा एक्सीडेंट होतो. त्यात महेशचा एक पाय कापावा लागतो. महेश जीवनच त्या क्षणी थांबतं. पण ईश्वरी ही नावाप्रमाणेच पार्वती होती. तिच्या शक्तीच्या पाठिंब्याने तो अपंगांसाठी जलतरण स्पर्धेत भाग घेण्याचे ठरवतो. व तिच्या अव्याहत मेहनतीने जिंकतो. तसेच पुढच्या स्पर्धांना देखील उस्फूर्तपणे भाग घेईल असे तिला वचन देतो.ईश्वरीला त्याने जिंकण्याचं वचन दिलेलं असतं ते तो पाळतो. आणि तिला नमन करतो.
पुन्हा एकदा पार्वती शिवाय शिव नाही हे सिद्ध करतो.
——वैशाली देव
शब्द संख्या 100
