#माझ्यातलीमी
#वीकेंडटास्क (२४/१/२६)
#जाहिरात
इवेंट्स बाय मनिषा
(“सोहळा तुमचा आपुलकी आमची … बारकाव्यांपासून भव्यतेपर्यंत”)
पल्लवी ला बघायला पाहुणे आले होते. मुळातच ती सुंदर, सुस्वभावी आणि उच्चशिक्षित असल्याने पवन ने लगेच होकार दिला. पवनही सर्वसृष्टीने तिच्यासाठी योग्य वर होता.. नाही म्हणण्याचे कारणच नव्हते. लग्नानंतर करियर करता येईल असं आश्वासन पवनने दिलं आणि आता तिच्याकडे नाही म्हणायचं काही कारणच नव्हतं.
मात्र एक अडचणच झाली ती म्हणजे अवघ्या १५ ते २० दिवसात लग्न व्हायला हवं नाहीतर दोन वर्ष वाट पाहावी लागली असती कारण पवन अमेरिकेत नोकरीला होता. आता मुद्दाम भारतीय मुलीशीच लग्न करायचं म्हणून तो सुट्या घेऊन आला होता.
इतक्या लवकर सगळं कस होईल .. लग्नपत्रिका छापण्यापासून ते सगळे रितीरिवाज पार पडत मुलीची पाठवणी करेपर्यंत.. !?
यावर पल्लवीच्या भावाने उपाय शोधला .. इव्हेंट मॅनेजमेंट .. पण काहीच ओळख नसताना, अनुभव नसताना कसं होणार ही चिंता होतीच .. त्यातही ती “इव्हेंट्स बाय मनिषा” ही कंपनी त्याने गुगल वरून शोधलेली .. कंपनीच्या टॅग लाइन ने आणि याआधीच्या ग्राहक रिव्ह्यूस ने त्यांनी विश्वास ठेवला .. टॅग लाइन होती ..
“सोहळा तुमचा आपुलकी आमची || बारकाव्यांपासून भव्यतेपर्यंत”
इव्हेंट्स बाय मनिषा कंपनीने त्यांचं काम पत्रिका छापण्यापासून ते पल्लवीच्या पाठवणी पर्यंत संपूर्ण जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
ब्रँड चे नाव : इवेंट्स बाय मनिषा
टॅग लाइन : सोहळा तुमचा आपुलकी आमची … बारकाव्यांपासून भव्यतेपर्यंत
®️©️ मनिषा चंद्रिकापुरे (२४/०१/२६)

