आरोग्यधन

inbound2683891223998552684.jpg

#माझ्यातलीमी
#रेडिओ शो
#मी आरजे
११/७/२५

नमस्कार मंडळी , कसे आहात सगळे ? मजेत ना? मजेतच असाल कारण तुम्ही माझा शो रोज ऐकून तुमच्या आरोग्याची काळजी घेत आहात .
तर मी आर जे स्वाती ,तुमच्या सर्वांचे रेडिओ ७२.३ या चॅनल वर , आपल्या ५ च्या आरोग्य धन ह्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे ..
आज आपल्याकडेआले आहेत आहारतज्ज्ञ डॉ मनिषा .. डॉ मनिषा , तुमचे आरोग्य धन ह्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत .. आणि कोणालाही काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर ह्या नंबर …..वर संपर्क करा .. तर सुरवात करू या आपल्या आरोग्य धन ह्या आपल्या कार्यक्रमाला ..

लवकर निजे, लवकर उठे त्यासी आरोग्यसंपदा लाभे, ही म्हण आपणा सर्वांनाच माहीत तर आहे. पण आजकालच्या जीवनात कोणीही तसं वागताना दिसत नाही. रात्री उशीरा जेवण, काहीही खाणं, उशीरा झोपायचं की सकाळी उठायला हमखास उशीर.. परत पळत-पळत काम करायची..अवेळी जेवण करायचं किंवा वडा पाव , चहा कटिंग वर दिवस काढायचा .. प्रत्येका च स्पर्धात्मक आयुष्य ,ज्यात ताण तणाव फ्री मध्ये मिळतो ..त्यामुळे ऍसिडिटी म्हणजे आम्लपित्त ही समस्या बऱ्याच जणांमध्ये उद्भवते ..

तर डॉ तुम्ही ऍसिडिटी म्हणजे नक्की काय ह्या बद्दल थोडक्यात सांगाल का ?

ऍसिडिटी म्हणजे पोटातील ऍसिडची पातळी वाढणे. ऍसिड हे अन्न पचनासाठी आवश्यक असते, पण जेव्हा ते जास्त प्रमाणात तयार होते, तेव्हा ऍसिडिटीची समस्या उद्भवते.
जस तुम्ही मगाशी म्हणालात आजकाल लाईफ स्टाईल मुळे
जंक फूड आणि ताण दोन्हीही आम्लपित्त किंवा आम्लपित्त रिफ्लक्समध्ये योगदान देऊ शकतात. चरबी, मीठ आणि मसाल्यांचे प्रमाण जास्त असलेले जंक फूड पोटाच्या आवरणाला त्रास देऊ शकते आणि पचनास विलंब करू शकते, ज्यामुळे पोटातील आम्ल उत्पादन वाढू शकतात. ताण पोटातील आम्ल पातळी वाढवू शकतो आणि विद्यमान आम्लपित्त समस्या वाढवू शकतो.

डॉ ,बरेच प्रश्न येत आहेत आपण एक मिनिटाच्या विश्रांती नंतर पुढचे प्रश्न घेऊ ..

पचनासाठी उत्तम वनदेवी हिंग ..वनदेवी हिंग वापरा आणि जेवणाचा स्वाद वाढवा .. हर घर का स्वाद किंग वनदेवी हिंग ..

पुन्हा एकदा रेडिओ ७२.३ या चॅनल वर , आपल्या ५ च्या आरोग्य धन ह्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे.

हिना ताई नी प्रश्न विचारला आहे की अ‍ॅसिडिटीची लक्षणे कोणती आणि अ‍ॅसिडिटी टाळण्यासाठी घरगुती उपाय सांगा ?

छाती, पोट किंवा घशात वेदना आणि जळजळ होणे,
पोट फुगणे किंवा गॅस, अपचन
बद्धकोष्ठता ,मळमळ किंवा उलट्या होणे,खाल्ल्यानंतर पोटात जडपणा येणे.
वारंवार ढेकर येणे
न पचलेले अन्न तोंडात परत येणे अशी अनेक अ‍ॅसिडिटी ची लक्षणे आहेत ..
अ‍ॅसिडिटी टाळण्यासाठी जास्त मसालेदार आणि तेलकट पदार्थ टाळा , वेळेवर भूक लागली की जेवा , नियमितपणे आणि थोडे थोडे खा,भरपूर पाणी प्या , रोज थोडातरी व्यायाम करा ..
ऍसिडिटी झालीच तर त्वरित घरगुती उपाय म्हणजे
थंड दूध पिणे, तुळशीची पाने चावणे, आणि जेवणानंतर बडीशेप खाणे हे काही चांगले पर्याय आहेत.
तसेच ऍसिडिटी होऊ नये म्हणून रोज सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यात लिंबू पिळून , मध टाकून पिणे , थंड पाणी न पिणे , फायबर पदार्थ खाणे , फळ ,सलाड ह्यांच सेवन करणे .रोज एक सफरचंद खाणं केव्हाही चांगलं ..

धन्यवाद डॉ पुढचा प्रश्न घेण्याआधी आपण विश्रांती घेऊ .

टेस्ट मे बेस्ट , मम्मी और एव्हरेस्ट ..एव्हरेस्ट पावभाजी मसाला , एव्हरेस्ट चना मसाला .

पुन्हा एकदा रेडिओ ७२.३ या चॅनल वर , आपल्या ५ च्या आरोग्य धन ह्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे.

डॉ ऍसिडिटी टाळण्यासाठी योगा करणे जरूरी आहे का ?

हो , योगासनांमुळे पचनक्रिया सुधारते आणि अन्न चांगले पचायला मदत होते. त्यामुळे
ऍसिडिटी कमी होते .वज्रासन,बद्धकोणासन,
भुजंगासन,पवनमुक्तासन ही काही योगासने ऍसिडिटी कमी करण्यासाठी जरूर करावी ..

अगदी अल्पसा ब्रेक आणि लगेच परत येऊ या ..

वॉशिंग पावडर निरमा ,वॉशिंग पावडर निरमा, दूध की सफेदी निरमा से लाये, सब की पसंद निरमा ..

पुन्हा एकदा रेडिओ ७२.३ या चॅनल वर , आपल्या ५ च्या आरोग्य धन ह्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे.

डॉ पुढचा प्रश्न स्मिता तांबे यांनी विचारला आहे .
संतुलित आहाराबद्दल थोडक्यात माहिती द्या ?

संतुलित आहारामध्ये शरीराच्या गरजेनुसार कर्बोदके, प्रथिने, तंतू, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे आणि खनिजे यासारखी सर्व आवश्यक पोषक तत्त्वे योग्य प्रमाणात असतात. म्हणून, संतुलित आहार हा निरोगी शरीर राखण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे कारण प्रत्येक जेवणात योग्य प्रमाणात पोषण असते.
ॲसिडिसिटी होऊ नये म्हणून
फायबरयुक्त पदार्थ जसे की
फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि शेंगा यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करणे कारण फायबर पचनक्रिया सुधारवते आणि आम्लपित्त होण्याची शक्यता कमी करते. तसेच
पचनास सोपे असलेले पदार्थ खावेत जसे
खरबूज, केळी, सफरचंद आणि नाशपाती यांसारखी फळे पचनास सोपी असतात आणि तीही ऍसिडिटी कमी करण्यास मदत करतात.
सफरचंद तर रोज एक खाल्लच पाहिजे . सफरचंद खाण्याचे अनेक फायदे आहेत. ते फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे, ज्यामुळे पचन सुधारते, हृदय निरोगी राहते आणि वजन नियंत्रणात राहते. म्हणूनच फेमस लाइन आहे An apple a day keeps the doctor away.
नैसर्गिक ऍंटॅसिड पदार्थ जसे
ऍलोवेरा, आले, आणि बडीशेप यांसारख्या पदार्थांमध्ये नैसर्गिक ऍंटॅसिड गुणधर्म असतात, जे ऍसिडिटी कमी करण्यास मदत करतात.
एक प्रयोग तुम्ही सगळ्यांनी जरूर घरी करा .. एका काचेच्या ग्लासात पाणी घ्या ..त्यात चपातीचा एक तुकडा टाका ..मेडिकल स्टोअर मधून tincture आयोडिन घेऊन या , आणि थोड tincture आयोडिन त्या ग्लास मध्ये टाका ..चपातीचा तुकडा अगदी काळा ठिक्कर पडतो आणि ग्लास मधलं पाणी काळ होत . व्हिटॅमिन सी ची एक गोळी बारीक कुटून त्यात टाका , लगेच पाणी स्वच्छ होत आणि चपातीचा तुकडा ही सफेद होतो ..
सांगायचा हेतू हा की पोटाचे आतडे हे ही जर आहार संतुलिन नसेल, जंक फूड, मसालेदार ,तेलकट प्रमाण जास्त असेल तर अस काळ होत जात , त्याला स्वच्छ ठेवणं गरजेच असत म्हणून संतुलित आहार असावा ..

डॉ मी हा प्रयोग नक्की करून बघेल ..
डॉ पुढचा अंतिम प्रश्न आहे की आरोग्य हीच संपत्ती ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल ?

खूप छान प्रश्न आहे .
आरोग्य ही आयुष्यातील सर्वात मोठी पुंजी असते. सोने, चांदी, संपत्ती म्हणजे श्रीमंती नव्हे! पैसे मिळविताना तब्येत दुर्लक्षित राहून बिघडली, तर त्या मिळकतीचा उपभोग घेता येणार आहे का?शारीरिक व्यायाम नाही, कामाचा ताण,संतुलित आहार नाही , वाढणार प्रदूषण अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढवतात ..prevention is better than cure म्हणून आरोग्याची काळजी घ्या ..नातेवाईक, मित्र-मैत्रिणींशी संवाद ठेवा,प्रसन्न राहण्याकरिता छंद जोपासा .आणि हो , माझ्यातलीमी ह्या ग्रूप वर जॉइन व्हा , कारण डोक आणि मन सुदृढ तर शरीर सुदृढ ..

हे मात्र अगदी बरोबर बोललात डॉ..

तर मी स्वाती आर जे आज च्या कार्यक्रमाची सांगता करताना तुम्हाला सगळ्यांना आवाहन करते आहे की खुश रहा ,मजेत रहा , आरोग्याची काळजी घ्या आणि लवकरात लवकर माझ्यातलीमी हा ग्रूप जॉइन करा , आणि केला असेल तर मस्त सगळे टास्क एंजॉय करा .

आणि कायम लक्षात ठेवा .
हसते ,हसते कट जाये रस्ते ,जिंदगी यू ही चलती रहे ,खुशी मिले या गम बदलेंगे ना हम,दुनिया चाहे बदलती रहे…

चला मग मी आर जे स्वाती आपल्या सगळ्यांचा निरोप घेते ,
भेटूया उद्या पुन्हा ह्याच वेळी ..रेडिओ ७२.३ या चॅनल वर , आपल्या ५ च्या आरोग्य धन ह्या कार्यक्रमामध्ये .

सौ स्वाती येवले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!