आयुष्य बदलवणार खरं प्रेम

#माझ्यातलीमी
#लघुकथाटास्क (०५/०१/२६)
#लघुकथा
@everyone

दिलेले वाक्य : काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात, मिळाल्या तरीही नाही मिळाल्या तरीही..

* आयुष्य बदलवणार खरं प्रेम *

डॉक्टर सीमाच स्वप्न आज पूर्ण झालं होतं कारण तिच्या आवडत्या हॉस्पिटलमध्ये तिला मायक्रोबायोलॉजीस्ट म्हणून जॉब मिळाला होता. डॉक्टर मैत्रिणींकडून तिला कळलं की त्यांच्या हॉस्पिटलमध्ये खूप हँडसम डॉक्टर शिरीष गायनॅकॉलॉजिस्ट आहेत. डॉक्टर शिरीषच्या मागे खूप मुली आहेत

कल्चररिपोर्ट साठी डॉक्टर शिरीष एकदा स्वतःमायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटमध्ये येतात तेव्हा सीमाची आणि शिरीषची पहिल्यांदा नजरानजर होते. लव ऍट फर्स्ट साइट ह्याबद्दल आधी ऐकलेल पण याचा अनुभव त्या दोघांनी पहिल्यांदाच त्यावेळेला घेतला.

त्यानंतर रोज काही कारणाने डॉक्टर शिरीष सीमाच्या डिपार्टमेंटमध्ये यायला लागले .सीमालाही ते खूप आवडत होते .पण सीमा त्यांना टाळत होती. शेवटी धीर एकवटून शिरीष सीमाला प्रपोज करतात. पण सीमा चक्क त्यांना नकार देते.त्याच्यामुळे त्यांना खूप धक्का बसतो. शिरीष तिला नकाराच कारण विचारतात तेव्हा ती सांगते की काही वर्षांपूर्वी तिचा एक अपघात झालेला होता त्या अपघातानंतर ती कधीही आई होऊ शकणार नाही असं डॉक्टरांनी निदान केलं होतं तरीसुद्धा डॉक्टर शिरीष म्हणतात की मी लग्न करेल ते तुझ्याशीच. कारण माझं तुझ्यावरती खरंच मनापासून प्रेम आहे .तेव्हा सीमा म्हणते की कितीतरी पेशंटची तुम्ही डिलिव्हरी केलेली आहे पण मी जर तुमच्याशी लग्न केल तर तुमच्या बायकोची तुम्ही कधीच डिलिव्हरी करू शकणार नाही. मला तसं नकोय म्हणून मला तुमच्याशी लग्न करायचं नाही .तेव्हा डॉक्टर शिरीष म्हणतात की काही गोष्टी ह्या आयुष्य बदलून टाकतात त्या मिळाल्या तरी आणि नाही मिळाल्या तरी.मी तुला जेव्हा पहिल्यांदा बघितल तेव्हाच प्रेम शब्दाचा अर्थ मला कळला ,प्रेमात पडल्यामुळे माझं आयुष्य बदललं .मला अपघाताबद्दल लपवलं नाही तू , उलट सगळं खर सांगून तू तर मला अजून तुझ्या प्रेमात पाडलस . तू मला मिळालीस तर माझं आयुष्य आनंदात बदलेल नाही मिळाली तर दुःखात. मुलासाठी मेडिकल सायन्स मध्ये पर्याय आहेत आणि जरी त्यात यश नाहीच आलं तर दत्तक घेताच येईल. पण तू आता नाही म्हणू नकोस .मग सीमाही तयार होते कारण तिला खात्री पटते की एकमेकांवरच त्याचं खरं प्रेम , ज्यामुळे त्याचं आयुष्य बदललं आहे , मिळालं तर दोघे आनंदी,नाहीतर दोघेही दुःखी.

©️®️ स्वाती येवले
शब्दसंख्या..300

error: Content is protected !!