माझ्यातलीमी#लघुकथा#आऊटिंग व स्वातंत्र्यदिन
©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका
लहानपणी एकदा मित्राच्या आईसह तो दुचाकीवर गेला. विचारलं ..अरे..
तुझी आई एवढ्या बाटल्या का भरते नि घेते बरोबर?
मित्र त्याला सांगत होता .. अरे बेशुद्ध व्यक्तीला रस्त्यावर अचानक द्यायला आतापर्यंत पाणी उपयोगी पडलं..
पाच वेळा.
परत येताना तो म्हणत होता .. अरे कुणी आज बेशुद्ध नाही पडलं.
तर एक विचार मनात पक्का झाला.. येता जाताही
मदत करता आली तर करायचीच.
तर मोठं झाल्यावरही जोडी एकत्रच होती . मात्र संगतीत नादावादानं थोडं एन्जॉयमेंटच्या नावाखाली दोघांच़ही पिणं उनाडणं असं आऊटिंग काॅलेजात चालू झाले.
मस्त प्यायची .. मासेमारी करायची .. तिथंच ताणून द्यायची..पाण्यात शिरायचं ..उतरली की परतायचं..
असं ठरवलं आणि पाचही जण निघाले.
लाल गाडीवर भगवा ध्वज.. १५ ऑगस्ट.. आणि आगेकूच.. कर्णा असल्यासारखा स्टिरिओसाउंड.
..
..
इकडं गावाकडची टारगट उनाड पोरं..आणि सांड..
त्याच्या वशिंडावरनं हात फिरवत होती.. थाप टाकत होती
आणि सांडाला खायला घालत होती.प्यायलाही देत होती.
पण काय.. तर अफू दारू ..
पैलवान झुलत होते ..सांडही झुलत होता..
आणि आता ही शहरी मुलं पोचली..प्यायला बसली.. एक पेग प्यायला..आणि अंगात वारं संचारलं.. पण चढणार थोडाच एक पेग??
अजून तीन पेग रिचवल्यावर मजा येणार होती.
पण तेवढ्यात एकच कालवा झाला आणि गावकरी धावताना दिसले .
तो सांड पाठलाग करत होता..पुढं शाळकरी मुलगी जीव हातात घेऊन धावत होती.
गावकऱ्यांचे लाल फडकी घेऊन सांडाच्या समोर जायचे
शर्थीचे प्रयत्न चालू होते.
सांड यांच्या बाटल्या ग्लास उडवत पुढ्यातनं निघून गेला.
एक जण उठला .. कार चालू केली ..लाल कार ..अवजड धूड अंगावर येतंय म्हटल्यावर सांडानं दिशा बदलली.
मुलगीही भेदरली ..कारच्या भीतीनं तीही उलट्या दिशेने म्हणजे सांडाच्याच बरोबर पळू लागली.
दुसरा चपळ धावण्यात पक्का होता.. पळत मुलीला धरले..कारनं सांडाला पळवले..गावकरी ही कारपाशी थांबले.
पोरगीतर ग्लानी येऊन पडली.
पण न प्यायलेल्या दारूनं या पाच जणांना शुद्धीवर ठेवलं होतं..एक जीव वाचवला होता.
परतताना एकच वाक्य पाचही जण परत परत घोकत होते.. दारूच्या थेंबालाही परत शिवायचं नाही.
आऊटिंग केलं तरी वहावत जायचं नाही.
एक सत्कृत्य केल्याचं समाधान काही वेगळंच होतं.
घरी आईनं दरवाजा उघडला.. आज तो शांतपणे नजर न चुकवता चेहरा न लपवता तडक बेडवर धाडकन कोसळला नाही.. उलटीही केली नाही.
बोलला.. भूक लागली.. वाढ पटापट जे असेल ते.
©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका
आज पाचही जण खऱ्या अर्थाने मुक्त स्वतंत्र झाले होते..
वाईट सवयीच्या गुलामीतून.


अवश्य वाचा अभिप्राय द्या
दारू पान थांबवले आणि एक साहस केलं