#माझ्यातलीमी
#अलकलेखन(१०/०९/२०२५)
#स्वप्नीलकळ्या 🥀
#दिलेले शब्द घालून अलक लिहा.
शब्द:—ट्रेन,स्टेशन,रूमाल, नजर
पाऊस
#रहस्य
मध्यरात्र …काळोखाचे साम्राज्य…
किर्रऽऽऽ दाट जंगल …. मुसळधार पाऊस …
स्टेशनच्या अलीकडेच कोणीतरी साखळी ओढून ट्रेन थांबवली…
गाढ झोपलेल्या तिला खडबडून जाग आली.. अचानक तिची जोरात किंकाळी….!
कुशीत झोपलेल्या तिच्या लहान बाळाच्या जागी नजर टाकली …. त्याजागी बाळाच्या डोक्याला बांधलेला रूमाल फक्त वाऱ्याने फडफडत होता….!
©®रोहिणी अग्निहोत्री
(स्वप्नीलकळ्या)🥀

खूप अप्रतिम
आगळी वेगळी छान अलक
खूप छान अलक
व्वा..एकदम छान.मस्त ट्विस्ट…👏👏👏👌👌👌
अप्रतिम.. ही खरी अलक
OMG .. जबरदस्त च ट्विस्ट
रहस्य 👌
अप्रतिम, खूप खूप सुंदर अलक
अप्रतिम