#माझ्यातलीमी#
#अलकलेखन#
ट्रेन,स्टेशन,नजर, रुमाल, पाऊस हे शब्द वापरून लेखन
आई बाबांची नजर चुकवून ती ट्रेनने जाण्यासाठी स्टेशनवर आली.आज दहाव्यांदा नकार पचवावा लागल्याने ती दुःखी होती.मागेमागे आलेल्या बाबांना मिठी मारून ती रडू लागली.बाबांनी खिशातून रुमाल काढून तिचे अश्रू टिपले.”रडू नको बाळा,मी आहे ना?” डोळ्यातल्या धारा अन् वरचा पाऊसाचे मिलन झाले होते.
©®सौ पुष्पा पी पटेल “पुष्पम् “
