अलकलेखन

inbound8905716454799680981.jpg

” मी तुझ्या बाजूनी कधी विचार केलाच नाही. ” हे वाक्य वापरून अलक (१७/९/२५)

………… स्वप्न भंग ………….

ऑफिसमधून आल्यावर तो तिला म्हणाला, मला प्रमोशन मिळाले आहे व पुढील आठवड्यात दोन वर्षासाठी मला लंडनला जावे लागेल. तिने आनंदाने त्याला मिठी मारली व म्हणाली, मनापासून अभिनंदन. तूझे लंडनला जायचे स्वप्न पूर्ण झाले. तो म्हणाला की, पण तूझे काय? तूझे दिवस भरत आले आहेत व आपण दोघेही अनाथाश्रमात वाढल्याने कोणीही नातेवाईक नाहीत. मलाच बाळ हवे होते म्हणून आपण बाळाचा विचार केला, पण मी तुझ्या बाजूनी कधी विचार केलाच नाही. मी स्वार्थी नाही, मला तू व आपल्या बाळा पेक्षा माझे स्वप्न महत्त्वाचे नाही. त्याने प्रमोशन नाकारले.

21 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!