” मनावर दगड ठेवून त्याने/ तिने हा निर्णय घेतला ” हे वाक्य वापरुन अलक. (२०/८/२५)
दोघेही एकाच ऑफिस मध्ये, रहायचेही एकाच भागात, जायची यायची बस पण एकच. असे असले तरी दोघांचे स्वभाव भिन्न असल्याने त्यांचे पटत नव्हते. दोघांनाही एकमेकांचा राग यायचा. सतत येता जाता दोघेही एकमेकांना टोमणे मारायचे. बाॅसने दोघांना एका प्रोजेक्टवर काम करायला सांगितले. प्रमोशन मिळणार म्हणून दोघांनी नाईलाजाने मनावर दगड ठेवून एकत्र काम करायचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना दोघांनाही माहीत नव्हते की, हा प्रोजेक्ट त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पाॅईंट आहे.

सुरेख
खूप छान
खुप छान
खूप छान 👌🏻👌🏻
सुंदर 👌🏻
सर्वांना मनापासून आभार🙏💕 मानले