#माझ्यातलीमी
#सुप्रभात
#लघुकथालेखनटास्क (२४/१०/ २५)
@everyone
खाली दिलेल्या वाक्यांवरून सुंदर #लघुकथा .
नातं हे एखाद्या पुस्तकासारखं आहे जे कितीही जुनं झालं तरी त्यातले शब्द बदलणार नाहीत
**अमूल्य दान**
राकेश आज खुप खुश होता , त्याचा इंटर्नशीपचा पहिला दिवस.हॉस्पिटलमधे शिरतांना
अनुभवी डॉक्टरांकडून शिकणे आणि विविध वैद्यकीय परिस्थिती हाताळण्याची कौशल्ये विकसित करणे हेच ध्येय डॉ राकेशने ठरवले होते.
राकेश त्याच्या आजोबांचा अतिशय लाडका,तो त्याच्या आजोबांना लहानपणापासून सगळ्या गोष्टी सांगायचा.आजही त्याला कधी एकदा घरी जाऊन इंटर्नशीपच्या पहिल्या दिवसाबद्दल सांगतो असं त्याला झालेलं.
आजोबाही खूप उत्साहाने त्याची वाट बघत असतात .आजोबा त्याला सांगतात की तू खूप मोठा यशस्वी डॉक्टर हो हाच माझा तुला आशीर्वाद.. आजोबांना पुस्तक वाचायची खूप आवड , एका पुस्तकात त्यांनी वाचलेलं असत देहदानासारखं श्रेष्ठ दान नाही .त्यांनी त्याप्रमाणे मृत्यु नंतर देहदान करण्याचा फॉर्म ही भरलेला असतो . पुस्तकही फक्त वाचण्यासाठी नसतात तर त्यातल्या चांगल्या गोष्टी अंमलात आणायच्या असतात असा आजोबांचं नेहमी सांगणं.
राकेशची इंटरनशिप चालू असतानाच आजोबांचं अकाली निधन होतं..आणि त्यादिवशी हॉस्पिटलमधे निष्णात डॉक्टर राकेश सारख्या इंटर्नना आजोबांच्या मृतदेहावर शिकवत असतात ..
राकेशच्या डोळ्यात पाणी येतं त्याला आजोबांचे शब्द आठवतात की माझा मृतदेह एकदिवस वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी उपयोगी पडेल .
त्याला जणू असं वाटत की आजोबांचा मृतदेह त्याला सांगतो आहे माझं तुझं नातं हे एखाद्या पुस्तकासारखं आहे जे कितीही जुनं झालं तरी त्यातले शब्द बदलणार नाहीत त्यामुळे मी माझा शब्द पाळला तुला यशस्वी डॉक्टर होण्यासाठी फक्त आशीर्वाद नाही दिला तर त्यासाठी संधीही दिली ,आता मिळालेल्या संधीच सोन कर , माझ्या देहावर प्रयोग करून खूप शिक आणि यशस्वी डॉक्टर हो ..
सौ स्वाती येवले
शब्दसंख्या २१२

