#माझ्यातलीमी
#शतशब्दकथा
#डायरी
२१/७/२५
अमूल्य खजिना
मुलीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करायचा , काय तयारी करायची म्हणून त्याने तिची डायरी काढली ..तिला जावून दोन वर्षे झाली .तिच्या आठवणी बरोबरच तिची डायरी त्याच्या सोबत आहे .. तिला कॅन्सर झाला तेव्हापासून तिने रोज डायरी लिहायला सुरुवात केली .. त्यात ती गेल्यानंतर प्रत्येक सणाला ,प्रत्येक महत्वाच्या प्रसंगाला त्याने काय करायचं हे तिने लिहायला सुरुवात केली ,जो पर्यंत ती लिहू शकत होती तो पर्यंत ती लिहितच होती ..
डायरी, एक अमूल्य खजिना..त्याचे हाल होऊ नये , तिच्या घराच घरपण टिकण्यासाठी म्हणून तिने त्याला दिलेला..
तिच्या प्रेरणेने त्याने ही मुलासाठी डायरी लिहायला सुरवात केली आहे त्याच्या सर्व आर्थिक उलाढालींची ..
सौ स्वाती येवले
शब्दसंख्या -१००

