#माझ्यातलीमी
#ब्लॉगलेखन
#लघुकथा
विषय …माणसाकडे पर्याय जास्त असतील तर त्याला त्याच्यासाठी योग्य काय आहे याचीही समज राहत नाही
शीर्षक … अपरिपक्व
राजेशला चांगली छान नोकरी मिळाली, चांगला सेटल झाला म्हणून त्याचे आई-वडील त्याच्यासाठी स्थळ बघायला लागले .राजेश दिसायलाही छान होता शिकलेला होता त्याची नोकरी मस्त होती , पॅकेज चांगल होत , शिवाय एकुलता एक मुलगा त्यामुळे आई वडिलांची सगळी प्रॉपर्टी त्याचीच.
त्याच्यामुळे त्याच्याकडे जणू काही स्थळांची रांग लागली होती. राजेशने अनेक मुली बघितल्या, पण प्रत्येक मुलीत काहीतरी खोट काढायचा. कोणाची उंची कमी,कोणाचा रंग नाही आवडला ,कोण हुशार वाटत नाही, कोण स्मार्ट वाटत नाही अशी अनेक कारणे देऊन त्याने 24 मुलींना नकार दिला .. शेवटी काय झालं त्यांच्या समाजामध्ये असं पसरलं की राजेश अति शहाणा आहे, स्वतःला जास्त समजतो, त्याच्याकडे पर्याय जास्त आलेत त्यामुळे त्याच्यासाठी योग्य कुठला हेच त्याला समजत नाहीये म्हणून मग नंतर नंतर त्याला स्थळे येणं ही बंद झाली ..
शेवटी वैतागून त्याची आई त्याला म्हणाली पर्याय जास्त असतील पण आपल्यासाठी योग्य काय ही समज नसेल तर त्याला विचारांची अपरिपक्वता म्हणतात ,आता आयुष्यभर अविवाहित रहायची वेळ येऊ नये म्हणून घे एखाद्या देवाचं नाव ..पण पुन्हा तुझी पंचाईतच कारण तिथेही भरपूर पर्याय , तेहतीस कोटी देवामध्ये कोणाच नाव घ्यावं हाही प्रश्न तुला पडेल कारण निर्णय क्षमता घेण्याची कुवत नसणाऱ्या तुझ्यासारख्याला अपरिपक्व म्हणतात ..
सौ स्वाती येवले
टिप ….आजकाल तरुण मुलामुलींमध्ये तडजोड हा प्रकार कमी होत चालला आहे , लग्नाच्या आधीही आणि लग्नानंतर ही ..आईवडिलांची सुस्वंद साधून त्याचं ऐकून घेणं ही कमी झालं आहे ..त्याला त्यांच् वैचारिक स्वातंत्र्य म्हणायचं की विचारांची अपरिपक्वता..म्हणून ह्यावर लघुकथा लिहावीशी वाटली .
शब्दसंख्या ..१९०
