#माझ्यातलीमी
#लघुकथालेखन
#अनमोल_नातं
#स्वप्नीलकळ्या🥀
विषय:—-“खरं नातं चांगल्या पुस्तकासारखं असतं. ते कितीही जुनं झालं तरी त्यातील शब्द कधीही बदलत नाही. ”
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
#अनमोल_नातं
अलका आणि शितल दोघी जीवश्चकंठश्च मैत्रिणी. त्यांचे एकमेकींशिवाय अजिबात पान हलत नसे. पंधराव्या- सोळाव्या वर्षी जुळलेलं मैत्रीच नातं मनापासून जपलेलं! दोघींचे भावबंध अतिशय खोलवर जुळलेले!
“रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रिचं नातं जास्त अनमोल असतं “असे जाणकार लोक म्हणतात.जगात नात्यातील रेशमी गुंतवणूक एकच ती म्हणजे मैत्री.
दोघींनाही पुस्तक वाचनाची अत्यंत आवड होती.दोघी मिळून नवनवीन पुस्तके आणून वाचनात रमून जात असत. तसेच त्यांना पुस्तकातील अनमोल वचने वहीत लिहून ठेवायची संवयच लागली होती. त्यातील बहुतेक वचने ही मैत्रीवरीलच असत.
ही वचने म्हणजे मित्रमैत्रिणींमधील प्रेम, विश्वास व समजून घेण्याची भावना व्यक्त करणारे सुंदर विचारच. जे विचार नाते अधिक घट्ट करतात. या वचनांमध्ये मैत्रीचे महत्व, निस्वार्थता आणि आयुष्यभर साथ देण्याची भावना अधोरेखित होते. त्यांना आवडलेली दोन वचने…
१)मैत्री असावी सोन्यासारखी जी वेळेनुसार अधिक मौल्यवान होते.
३)खरा तोच मित्र किंवा/ मैत्रीण की जी किंवा/ जो आपल्या सुखदुःखात सहभागी होतो , आपल्याला समजून घेतो व आपल्याला प्रोत्साहित करतो.
लग्नानंतर पत्रव्यवहार, अधूनमधून भेटीगाठी ह्यातून त्यांची मैत्री पूर्वीसारखीच टिकून राहिली होती. पंचवीस वर्षानंतर अचानक अलकाच्या नवऱ्याचे निधन झाले. अलकाला बहिण नसल्याने शीतलनेच तिला सख्या बहिणीसारखा आधार दिला. अलकाही तिच्यावर बहिणीसारखेच प्रेम करत होती . निधनानंतर
पंधरा दिवस शीतल तिच्या सोबत तिच्या घरी येऊन राहिली. काही दिवसानंतर तिला आपल्या घरी माहेरपणाला घेऊन गेली व दु:खातून बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न केले.
एखाद्या सख्या बहिणीने दिले असते त्यापेक्षा जास्त प्रेम तिला दिले व एकुलत्या एक मुलासाठी पुढील आयुष्य थोडे आनंदाने जग असे वारंवार समजावून सांगितले .
थोडक्यात पुस्तकातून लिहून घेतलेली वचने प्रत्यक्ष आचरणात आणली गेली होती .
“त्यांच नातं चांगल्या पुस्तकातील अनमोल वचनासारखंच अनमोल ठरले होते.”
(२३५ शब्दसंख्या)
©® रोहिणी अग्निहोत्री
(स्वप्नीलकळ्या)🥀
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

