………. अनपेक्षित सुवर्णयोग……..
मुंबईवरून बंगलोर व बंगलोर वरून कोयंबतूरला आलो. प्रवासच..प्रवास. पण कंटाळा अजिबात नाही. स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी परिवारासोबत आऊटिंगला कोचीला गेलो. गेल्यागेल्याच समुद्रावर फेरफटका मारला. समुद्रातील लाटा, तिच्या वाहण्याचा आनंद लुटत, हवेची एक सुंदर झुळूक व सूर्याची उबदार किरणे अंगावर झेलीत प्रसन्नतेच्या वातावरणात बुडलो.
……. तितक्यातच आमच्या सोसायटीतून फोनची रिंग वाजली. उद्या माझ्या मिस्टरांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे असा निरोप होता. मुलगा म्हणाला बाबा, काय करायचे? आपण दोन दिवस मुक्कामाला आलो.
……. तुझी हरकत नसेल तर जाऊया. मला आवडेलच. इतका चांगला सुवर्णयोग मला गमवायचा नाही. मुलाने लगेच गाडी काढली व रातोरात आम्ही कोयंबतूरला रात्री दोन वाजता पोहोचलो.
…….. सकाळी आठ वाजता ध्वजारोहण. लगेच तयारी करून आम्ही ध्वजारोहणासाठी खाली आलो. मिस्टरांच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज झळकत होते. स्वतःसाठी सगळे जगतात पण स्वातंत्र्य सैनिकांचे पर्यायाने आपले आयुष्य पहा नेहमी एकच लक्ष…. माझी मातृभूमी हा ध्यास.
……. मिस्टरांनी वीरांना नमन करून, जयहिंद.. जय महाराष्ट्र हा एकतेचा ध्यास मनी ठेवून अभिमानाने तिरंगा फडकविला.
….. सदैव सैनिका पुढे जायचे….. हीच प्रेमळ हाक तुमच्या धैर्यासाठी … 🙏
…… स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा…. 👏
….. शब्द संख्या.. १५२….
……… अंजली आमलेकर…….. १५/८/२५

सुंदर कथा