अंतर

#माझ्यातलीमी
#शतशब्दकथा
#डायरी

अंतर

आजार मोठा होता तिचा, तरीही अजून दिड – दोन वर्ष जगू शकली असती ती ! पण मनाने खूप खचली. औषधं घेईनाशी झाली. सर्वांनी समजावून पाहिलं.

त्याला म्हणायची, ” माझं जाऊदे रे आता, पण तुझं आयुष्य भरभरून जग. आपली मुलगी अजून लहान आहे ..पण समजूतदार आहे ” .

आज तिच्या मागे तिचे कपाट आवरताना तिची डायरी सापडली त्याला. ती चाळताना त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
त्यात लिहिलं होतं, ” मला माहित आहे, तू तुझ्या ऑफिसमधील मुलीत अडकत चालला आहेस . आपल्यात कधी हे ‘ अंतर ‘ निर्माण झालं कळलंच नाही ! कदाचित माझ्या आजारपणामुळे ! पण नाही मला तक्रार आता कशाहीबद्दल.”

त्याने शेजारी बसलेल्या ‘ ती ‘ च्या कडे पाहिले.
म्हणजे नकळत मीही जबाबदार आहे ?

शब्दसंख्या – १००

सौ. सुविद्या करमरकर
पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!